Saturday, July 20, 2024
Homeमहामुंबईवांद्रे-वरळी सी लिंकवर तरुणाची आत्महत्या

वांद्रे-वरळी सी लिंकवर तरुणाची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून उडी मारून आकाश सिंग या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तो मुंबईच्या परळ परिसरातील रहिवासी असून एका खासगी बँकेत नोकरी करत होता. घटनेच्या दिवशी तो टॅक्सीने कार्यालयातून घरी जात होता. यावेळी त्याने वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असताना टॅक्सी थांबवली आणि पुलावरून थेट समुद्रात उडी मारली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

शुक्रवारी रात्री आकाशने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सी बूक केली. यानंतर त्याने चालकाला वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितले. पुलावरून जात असताना आकाश सिंग फोनवर बोलत होता. यावेळी त्याने अचानक चालकाला सांगितले की कारमधून फोन बाहेर पडला आहे. यामुळे चालकाने सी लिंकवर कार थांबवली. यानंतर आकाशने कारमधून खाली उतरत थेट समुद्रात उडी मारल्याची माहिती वाहन चालकाने दिल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने रात्री उशिरा आकाशचा मृतदेह बाहेर काढला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. प्राथमिक तपासानुसार, आकाशचे तीन महिन्यांपूर्वी प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -