Tiger 3 : सलमान-कतरिनाची दिवाळी जोरात!

मुंबई : सलमान-कतरिना दिवाळीनिमित्त (Diwali) म्हणाले, ‘आम्ही टायगर ३ सह (Tiger 3) देशभरातील सर्वांसोबत दिवाळी साजरी करत आहोत!’


भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक, सलमान खान (salman khan) आणि कतरिना कैफ, यांचा चित्रपट कधीच दिवाळीत एकत्र रिलीज झालेली नाही! टायगर ३ सह, ही प्रतिष्ठित जोडी या दिवाळीत भारताचे आणि जगभरातील सिनेप्रेमींचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे!



प्रदर्शित होण्याआधीच 'टाईगर ३' ने कमावले १० कोटी


सलमान खानचा चित्रपट टायगर ३ जबरदस्त ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची आतापर्यंत ३.६३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच टायगर ३ ने अ‍ॅडवान्स बुकिंग विक्रीमुळे आतापर्यंत १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमान सह कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांचा हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.


सलमान म्हणतो, “दिवाळीत रिलीज होणे हे नेहमीच खास असते कारण या सणाने मला नेहमीच गुडलक दिले आहे, याच्या खूप गोड आठवणी आहेत. हे खूपच आश्चर्यकारक आहे की कतरिना आणि मी, एक जोडी म्हणून, एकही दिवाळी रिलीज दिलेला नाही आणि टायगर ३ आमचा पहिला दिवाळी चित्रपट असेल! सहकलाकार म्हणून आम्ही असे चित्रपट केले आहेत जे अनेकांना आवडले आहेत. त्यामुळे, आम्ही त्यांना टायगर ३ सह सर्वोत्तम दिवाळी देऊ शकलो तर आम्हाला खूप आनंद होईल.


कतरिना म्हणते, “ही दिवाळी विशेष आहे कारण माझा टायगर ३ हा चित्रपट रिलीज होतोय, जो वाईटावर विजय मिळवणारा चित्रपट आहे. दिवाळीला रिलीज होणारा सलमानसोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे! सलमान आणि मी सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी आणि या दिवाळीच्या सणामध्ये आणखी आनंद आणि उत्साह वाढवण्यास उत्सुक आहोत.”


ती पुढे म्हणते, “यावर्षी मला वाटते की आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासह संपूर्ण देशभरात सर्वांसोबत दिवाळी साजरी करू आणि मला आशा आहे की टायगर ३ मध्ये आम्ही सर्वांना एक अप्रतिम दिवाळी भेट देऊ!”


या दोन सुपरस्टार्सच्या हृदयात दिवाळीला विशेष स्थान आहे कारण ती नॉस्टॅल्जियाने भरलेली आहे.


सलमान म्हणतो, “माझ्यासाठी दिवाळी हा नेहमीच लोकांना एकत्र आणणारा, कुटुंबांना एकत्र आणणारा सण राहिला आहे. ही दिवाळी माझ्या लोकांसोबत घालवण्यासाठी मी उत्सुक आहे. मी या दिवाळीत माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत टायगर ३ पाहीन आणि मला आशा आहे की प्रत्येकजण सुद्धा पाहेल आणि मोठ्या पडद्यावरचा हा अनुभव पूर्णपणे एन्जॉय करेल.”


कतरिना पुढे म्हणाली, “दिवाळी हा नेहमीच सेलिब्रेशनचा सण राहिला आहे. माझ्यासाठी, हा एकजुटीचा, प्रेमाचा, प्रकाशाचा, आपल्या कुटुंबांचा आणि मैत्रीच्या बंधांचा आणि वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो याची पावती देणारा सण आहे.


आदित्य चोप्रा निर्मित आणि मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर ३ या रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष