Pollution : राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० टॅंकर्स


रस्त्यांवरील धुळ साफ करण्यासाठी विशेष पथके


एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धुळमुक्त करावीत


प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई : राज्यातील प्रदुषण (Pollution) नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे. एमएमआरडीची बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अॅण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, असे मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले.


वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आदी यावेळी उपस्थित होते.


प्रदूषण मुक्त मोहीम लोकचळवळ व्हावी


मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदुषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करा


मुंबईत विविध ठिकाणे सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत त्याचबरोबर साचलेली धुळे साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या १००० पर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धुळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणं धुळमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले.





माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून न्यावी


सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदुषण होणारी ठिकाणांवर संनियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


अर्बन फॉरेस्ट वाढवावे


राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. मेडन मध्ये वृक्षारोपण करावे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदुषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळाचे प्रदुषण कमी करण्यासाठी क्लाऊड सिंडींगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


प्रदुषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करा


राज्यातील प्रदुषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ञांनी प्रदुषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदुषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ञांनी केले.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,