हिंगोली : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता दुसर्यांदा उपोषण मागे घेतलं आहे. जरांगे यांनी (Maratha Samaj) राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी मुदत दिली आहे. तोपर्यंत जरांगे महाराष्ट्रभर मराठ्यांच्या भेटीगाठीसाठी १५ नोव्हेंबरपासून दौरे करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी ही काहीशी सकारात्मक चिन्हे असली तरी या मागणीसाठी आत्महत्येच्या घटना (Suicide Cases) काही थांबायचे नाव घेत नाहीत. मनोज जरांगेंनी अनेकदा आत्महत्या न करण्याचे आवाहन करुनसुद्धा हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील आदिनाथ राखोंडे या २७ वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली. तो उच्चशिक्षित असतानाही नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यात त्याने त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.
चिठ्ठीमध्ये आदिनाथने लिहिलं की, ‘एक मराठा लाख मराठा…मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्रीपर्यंत माझे जीवन संपवत आहे’. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…