Manoj Jarange : दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर दौरे

  79

६ टप्प्यात असणार दौरा


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीकरता उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा समाजाने सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा कोणालाच विसर पडू नये, ती मागणी धगधगतच राहिली पाहिजे यासाठी मनोज जरांगे पुन्हा राज्यभर दौरे करायला उभे राहणार आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.


मराठा आरक्षणाचा हा तिसरा टप्पा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे.


मनोज जरांगे हे दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे.


१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा


१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी


१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड


१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड


१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी


२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण


२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,


२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर


२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.


कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे. हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत