Elvish Yadav : एल्विश यादव प्रकरणात वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

रेव पार्टी, सापाचे विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय'


नोएडा : 'बिग बॉस ओटीटी'चा विजेता एल्विश यादव (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav) अडचणीत आला आहे. प्रसिद्धीझोतात आलेल्या या युट्यूबर विरोधात नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेव पार्टीत विषारी सापांचं विष पुरवणं, परदेशी मुलींचा 'सप्लाय' करणं असे अनेक आरोप एल्विशवर लावण्यात आले आहेत.


नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय' केल्याने एल्विश यादव चर्चेत आहे. आता या प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.


वनविभागातर्फे सापांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासात पाच कोब्रा विषारी असल्याचे तर चार साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे. डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय प्रशिक्षण करण्यात आलं आहे. विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे गुन्हेगाराला सात वर्षापर्यंतची शिक्षा भोगावी लागते. न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.


दरम्यान, या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एल्विश म्हणाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्यास तो तयार आहे. मनेका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. परदेशी मुलींचा 'सप्लाय' करतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या