मुंबई: सिडकोच्या कर्मचाऱ्यांना(cidco employee) यंदा दिवाळीत मोठी लॉटरीच लागली आहे. यंदा सिडकोने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ५० हजार रूपये बोनसची घोषणा केली आहे.त्यामुळे सिडको कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. बोनसची घोषणा होताच या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत तसेच मिठाई वाटत आनंद साजरा केला.
इतर महामंडळांच्या तुलनेत यंदा सिडको महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनस जाहीर केला आहे. महामंडळाच्या या निर्णयाने कर्मचारी प्रचंड खुश झाले आहेत. त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घोषित केलेल्या बोनसची रक्कम दिवाळीच्या आधी सर्व कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याऱची माहिती यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनसची घोषणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या बोनसच्या रकमेत वाढ करण्यात आलीआहे. या कर्मचाऱ्यांना यंदा १८ हजार ५०० रूपये बोनस दिला जाणार आहे.
ठाणे महानगरपालिकेकडूनही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी या कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० रूपये बोनस दिला जाणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…