Diwali Fashion : दिवाळीत स्टायलिश दिसायचंय? मग ट्राय करा 'या' अभिनेत्रींचे काही हटके लूक्स!

दिवाळी (Diwali Festival) म्हणजे तिखटगोड फराळावर ताव मारण्याचा आणि नटण्यासजण्याचा सण. वर्षभरात आपल्यासाठी अगदी मोजक्या कपड्यांची खरेदी करणारा प्रत्येक मध्यमवर्गीय दिवाळीत मात्र हमखास कपड्यांची खरेदी करतो. या दिवाळीत प्रत्येकालाच पारंपरिक (Traditional look) पण काहीतरी हटके लूक करावासा वाटत असतो. विशेषतः मुली या दिवाळीच्या सणाला साडी नेसण्यासाठी अजिबात कंटाळा करत नाहीत. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या आवडत्या अभिनेत्रींचे काही खास लूक्स जे मुली या दिवाळीत नक्कीच ट्राय करु शकतात.



१. आलिया भट्ट (Alia Bhatt)



आलिया आपल्या साध्या पण कमालीच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. तिने मेट गाला (Met Gala) सोहळ्यासाठी केलेला सिंपल लूकही सर्वांना प्रचंड आवडला होता. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात (National Awards) आलियाने परिधान केलेल्या स्वतःच्या लग्नातील शालूमुळे ती चर्चेत आली होती. यावेळेसही आलियाच्या सोबर लूकने चाहत्यांची मनं जिंकली. यंदाच्या दिवाळीत आलियाचा हाच सोबर लूक तुम्ही ट्राय करु शकता. साध्या कॉटन अथवा फॅब्रिकच्या साडीवर आलियासारखा केसांचा फ्रेंच रोल आणि त्यावर दोन गुलाबाची फुलं तुमचं सौंदर्य अधिक खुलवतील. त्यासोबतच तुम्ही या लूकवर मोत्यांचे दागिने घालू शकता.



२. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)



चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपटामुळे जगभरात पोहोचलेली अमृता खानविलकर मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अमृता नेसते त्या साड्याही मुलींच्या विशेष पसंतीस पडतात. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अमृताने नेसलेली पैठणीही खूप सुंदर होती. ज्या मुलींना दागिने आणि भरजरी साड्यांची आवड आहे, त्या अमृतासारखा लूक करु शकतात. पैठणी साडीला मॅचिंग नसणारा पण कॉन्ट्रास्ट (Contrast) कलरमधील ब्लाऊज यावर अधिक खुलून दिसेल. तसंच अमृताप्रमाणे एकाच रंगाच्या आणि पैठणीच्या रंगाला काही प्रमाणात मॅच होणार्‍या बांगड्या तुम्ही घालू शकता. सगळंच एकाच रंगात न घालता वेगवेगळ्या रंगांचं कॉम्बिनेशन करुन पैठणी नेसली तर ती अधिक सुंदर दिसेल.



३. साई पल्लवी (Sai Pallavi)



जास्त मेकअप न करता आपल्या नैसर्गिक सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी. दाक्षिणात्य चित्रपटातील (South Indian Films) या अभिनेत्रीची महाराष्ट्रातही तितकीच क्रेझ आहे. श्याम सिंह रॉय या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला साई पल्लवीने केलेला लूक खास होता. यंदाच्या दिवाळीत तुम्ही साई पल्लवीसारखा अत्यंत साधा पण क्यूट लूक ट्राय करु शकता. यात एखादी सुंदर साडी व त्यावर केस मोकळे सोडून केसांत गजरा माळू शकता. कानांत छोटे किंवा मोठे झुमके आणि हातात एकच बांगडी असा हा लूक दागिन्यांची जास्त आवड नसणार्‍या मुलींना खूपच सुंदर दिसेल.



४. मिथिला पालकर (Mithila Palkar)



मिथिला पालकर ही आताच्या काळातील तरुण आणि गोड अभिनेत्री आहे. तिचे कुरळे केस तिला खूप खुलून दिसतात. तिचे साडीमधीलही साधे लूक्स चाहत्यांना प्रचंड आवडतात. पण ज्यांना साडी अजिबातच नेसायला आवडत नाही किंवा साडी नेसण्यासाठी पुरेसा वेळ नसेल त्या मुली मिथिलाच्या या लूकप्रमाणे ड्रेस किंवा लेहंगा परिधान करु शकतात. अशा पद्धतीच्या ड्रेसवर मोठे आणि भरजरी कानातले किंवा झुमके फार सुंदर दिसतात. सोबतच कपाळावर एक छोटीशी टिकली सौंदर्यात आणखी भर पाडेल.

Comments
Add Comment

पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा

शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने

अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय

मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका