मुंबई : दिवाळी जवळ आली की जास्त बोनस (Diwali Bonus) मिळावा यासाठी कामगार मालकाला जास्तीत जास्त खूश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आज सकाळी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) दिवाळी बोनस मिळेल ह्या अपेक्षेने त्याचा नवीन मालक जो १० जनपथ वर असतो, त्याची चाटुगिरी करताना दिसला, असा टोला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लगावला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा (PM Narendra Modi) पराभव करायच्या हेतूने एकत्र आलेल्या इंडिया अलायन्सचे त्यांच्यातलेच मतभेद समोर आणत नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.
संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, दिवाळीचा बोनस मातोश्रीवर (Matoshree) मिळेल, सिल्व्हर ओकमधून (Silver Oak) मिळेल की, १० जनपथ वर मिळेल यासाठी लाळ टपकावत असताना इंडिया अलायन्स (INDIA Alliance) कशी टिकणार आहे, काँग्रेस बाकी राज्यांमध्ये कशी टिकणार आहे यावर संजय राजाराम राऊत सकाळी वायफळ बडबड करत होता. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो आहोत की, की इंडिया अलायन्स हा भारतामध्ये २०२४ च्या निमित्ताने झालेला एक फार मोठा घोटाळा आहे. २०२४ पर्यंत ही अलायन्स टिकणार नाही, हे एफिडेविटवर लिहून देण्याकरता आम्ही तयार आहोत.
पुढे ते म्हणाले, एका बाजूला नितीशकुमारजी हे काँग्रेसला नावं ठेवत आहेत दुसरीकडे अखिलेश यादव मध्यप्रदेशात प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष फ्रॉड आहे, असं म्हणत आहे. समाजवादी या इंडिया अलायन्समधील महत्त्वाच्या पक्षाचा प्रमुखच काँग्रेसला फ्रॉड म्हणत आहे. महाराष्ट्रामध्ये उबाठाच्या उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) जो पाळलेला डॉबरमॅन आहे, तो चिपळूणमधून भुंकत असतो. तो चिपळूणमध्ये बसून सीटवाटप करतोय. गल्लीत बसून दिल्लीचे निर्णय घेतोय. पण आम्ही सांगतो, येणाऱ्या निवडणुकीत उबाठाला १० च्या वरही जागा देणार नाहीत.
इंडिया अलायन्सची ही जी काही अवस्था आहे, ती घेऊन ते एनडीए आणि सन्माननीय नरेंद्र मोदींसारख्या बलाढ्य गटाशी लढण्यासाठी बोंबाबोंब करत आहेत. भांडुपचा देवानंद बोलतोय की २०२४ ला मोदींचे सरकार जाणार, इंडिया अलायन्स येणार. पण २०२४ पर्यंत तुम्ही एका नाड्याने तुमचं इंडिया अलायन्स बांधून तरी दाखवा. यांच्याच आघाडीचा घटक जर यांना फ्रॉड म्हणत असेल, तर भारताला अशा फ्रॉड लोकांच्या हातात द्यायचंय का? हे कितीही भुंकले तरी एका तोंडाने एकमेकांजवळ बघणार नाहीत, आणि नरेंद्र मोदी परत भारताचे पंतप्रधान होणार, असं नितेश राणे म्हणाले.
दिशा सालियान आणि सुशांतसिंगच्या केसमध्ये एक महत्त्वाचं वळण आलेलं आहे. मी जे वारंवार सांगतो की उद्धव ठाकरेंना परत भाजपा सोबत युती करायची आहे. त्यासाठी ते इकडेतिकडे लाळ टपकावत फिरतायत, दिल्लीमध्ये कोण भेटतंय का ते बघतायत. त्यांचा तो संजय राऊत कितीही बोंबलू दे, पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी परत भाजपने बिनशर्त त्यांना बरोबर घ्यावं यासाठी तडफडत आहेत. याचं कारण म्हणजे दिशा सलियान आणि सुशांतसिंगच्या केसमध्ये आदित्य ठाकरेला (Aditya Thackeray) अटक होणारच म्हणून उद्धव ठाकरेंचे भाजपासोबत येण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमदारांवर ५० खोक्यांचा आरोप लावत आहेत. मग त्यांनीच महाराष्ट्राला आणि देशाला उत्तर द्यावं की जे वकील आणि जे तक्रारदार दिशा सलियान आणि सुशांतसिंगच्या केसमध्ये कोर्टात गेले त्यांनी केस मागे घ्यावी म्हणून त्यांना ५० कोटींची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली की नाही? जर आदित्य या प्रकरणात नसेल तर वकील आणि इतर लोकांना ५० खोके का दिले आहेत, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, असं आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची गोड बातमी मला सकाळी मिळाली आणि अपेक्षेप्रमाणे भाजपाच भारतातला नं १ चा पक्ष आहे हे पुन्हा सिद्ध होईल. गेलं दीड वर्ष आम्ही गावागावांमध्ये लोकांकरता जी विकासकामं केली आहेत, जे निर्णय घेतले आहेत, त्याचंच प्रतिबिंब ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आलं आहे. आमच्या महायुतीचे तिन्ही पक्ष एक नंबर वर असतील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कोकण हा भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोकणात तुम्हाला भाजपाच एक नंबरला दिसेल. आमच्या चांगल्या वाईटात भाजपाच आमच्यासोबत उभा राहतो, त्यामुळे कोकणातल्या जनतेनेही यापुढे भाजपासोबतच राहायचे ठरवले आहे. अजितदादा हे राज्यातील फार मोठी ताकत आहे. राष्ट्रवादी मोठी करण्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे अजितदादांच्या बाजूने निकाल लागतोय यात आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं नितेश राणे म्हणाले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…