मुंबई : संजय राऊत, (Sanjay Raut) सुप्रिया सुळे, (Supriya Sule) रोहित पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या (Matchbox) आहेत. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का? अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी त्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला. त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आणि पोलिसांना जनतेची गैरसोय करू नका आणि रस्ता खुला करा असे सांगितले. पण तरीही विश्वप्रवक्त्यांनी विष ओकले. रोज सकाळी विष ओकण्याचे काम संजय राऊतानी थांबवलेले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समर्पित भावनेने काम करतात. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते. अनेक लोक त्यांच्यावरती आग ओकण्याचे काम करतात आणि त्या आगी मध्ये तेल ओतण्याचे काम दररोज सकाळी संजय राऊत करतात, असा हल्लाबोल वाघमारे यांनी केला.
संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार महाराष्ट्रातल्या काडीपेट्या आहेत. त्यांना जाती-जातीत तेढ निर्माण करून महाराष्ट्र पेटवायचा आहे का?? त्यांच्यामुळे जर महाराष्ट्र पेटला तर त्याची संपूर्णतः जबाबदारी त्यांचीच राहील. त्यांनी लक्षात ठेवावे जगात सगळ्या गोष्टीची किंमत वाढली पण काडीपेटीची किंमत वाढली नाही. ती अजूनही फक्त एक रुपयाच आहे. त्यामुळे आग लावण्याचे काम थांबवा, अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना फटकारले.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…