मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध, जरांगे पाटलांचे आभार : मुख्यमंत्री

Share

मुंबई : सरकार प्रामाणिकपणे गांभीर्याने मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करत असल्याचे तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चर्चेतून कोणताही प्रश्न सुटू शकतो, त्यातून मार्ग काढता येतो. आज मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. ही इतिहासातील पहिली घटना आहे की कायदेतज्ज्ञ उपोषणस्थळी चर्चेसाठी गेले, असे मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात 10 जण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षण देण्यासंदर्भातील निर्णय हा टिकणारा असला पाहिजे. शिंदे समितीनं देखील दिवस रात्र काम केलं आहे. आणखी काही कुणबी नोंदी सापडतील असे त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांचे देखील आम्ही सहकार्य घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल झालेल्या बैठकीत आम्ही सगळ्यांनी ठरवलं की, चर्चेतून प्रश्न सुटु शकतो, असेही ते म्हणाले.

Recent Posts

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

3 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

14 minutes ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

3 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

3 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

3 hours ago