Chitra Wagh Vs Sanjay raut : देवेंद्रजींच्या छत्रछायेतच चालते राऊतांची टिवटिव!

सर्वज्ञानी संजय राऊतांना मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी दिसत नाही का?


श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊतांनी केलेल्या टीकेचा चित्रा वाघ यांनी घेतला समाचार


मुंबई : ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे शुभदिप हे निवासस्थान असलेल्या परिसरात सामान्यांना वाहतूकबंदी करण्यात आल्याचे पत्रक ठाणे पोलिसांनी (Thane Police) जारी केले होते. मात्र, अशी कोणतीही सूचना आम्ही दिली नसल्याचे व व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच नको असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी स्पष्ट करत ठाणे पोलिसांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावरुन टीका केली. मुख्यमंत्र्यांसाठी रस्ता बंद करणे जरा अतीच झाले, ही पोलीस खात्याची मिंधेगिरी आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या टीकेचा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चांगलाच समाचार घेतला. थेट मातोश्रीवर निशाणा साधत त्यांनी खरमरीत टीका केली.


चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वज्ञानी संजय राऊत, मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? ठाकरे राजपरिवाराच्या या मातोश्री नामक किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी किती पोलीस पहारे, किती नाका बंदी आणि किती अडथळे पार करावे लागतात, हेही जनतेला कळू द्या. सर्वसामान्यांसाठी मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो, हेही एकदा सांगाच, असं आवाहन त्यांनी केलं.


कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात हिंसाचार आहे, बलात्कार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहे तिथे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर चोख प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, 'कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्री देवेंद्रजी एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा, असा भेदभाव करत नाहीत, हे आपल्याच उदाहरणावरून कळले असेलच. तुमची महाज्ञानी टिवटिवही देवेंद्रजींच्याच सुरक्षाव्यवस्थेच्या छत्रछायेत चाललेली असते, याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी वसुली धंदे केले, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे पोलीस कुणाचे मिंधे नाही, हे लक्षात घ्या सर्वज्ञानी' असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांची चांगलीच जिरवली आहे.





Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता