Shah Rukh Khan Birthday : बर्थडे मेरा पर तौफा आप सभी के लिए... किंग खानचं चाहत्यांसाठी आणखी एक गिफ्ट!

डंकीच्या टीझरनंतर आता 'ही' खुशखबर


मुंबई : बॉलिवूडचा बादशहा (Bollywood Badshah) शाहरुख खान आज आपला ५८वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे. त्याच्या अभिनयाने त्याने जगभरातून प्रचंड मोठा चाहतावर्ग (Fan following) गोळा केला आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या मुंबईतील 'मन्नत' (Mannat) या बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. आजच्या रात्रीही शाहरुखने घराच्या गेटवरुन सगळ्यांना हात दाखवत अभिवादन केलं. त्यामुळे तिथे उपस्थित चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


यानंतर आता प्रत्यक्ष वाढदिवशी किंग खान आपल्या चाहत्यांसाठी दोन मोठे गिफ्टस घेऊन आला आहे. एक भेट म्हणजे शाहरुखच्या आगामी 'डंकी' (Dunki) या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. तर दुसरी भेट म्हणजे, जगभरात गाजलेला शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा चित्रपट आजपासून नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहते भलतेच खुश झाले आहेत.


'जवान' ओटीटीवर रिलीज होण्याआधी शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने बॉम्ब लावलेला असतो आणि तो जवान नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यासाठी धमकी देत असतो. शाहरुख म्हणतो,"हॅलो नेटफ्लिकसवा, पहचानो मैं कहाँ हूँ? अगले दो मिनिट में जवान नेटफ्लिक्स पे रिलीज कर दो नहीं तो मैं तुम्हारे टुडुम का कर दूँगा बुडूम!". त्यानंतर लगेचच 'जवान' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येतो. बॉम्ब फुटतो त्यावेळेस शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकतो आणि बादशहा आपल्या चाहत्यांना म्हणतो, 'बर्थडे मेरा पर तौफा आप सभी के लिए, जवान देखिए'.





'जवान' या सिनेमाची निर्मिती ३०० कोटींमध्ये करण्यात आली होती, पण या सिनेमाचे राइट्स नेटफ्लिक्सने २५० कोटींमध्ये विकत घेतले आहेत. 'जवान' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडपट 'जवान' ठरला आहे, ११०० कोटींपेक्षा अधिक कमाई त्याने केली आहे. त्यामुळे रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत या सिनेमाने इतिहासही रचला आहे. या चित्रपटाच्या ओटीटीवरील आगमनाने चाहते खूश झाले आहेत. शिवाय 'डंकी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते