Rashtrasant Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५५वी पुण्यतिथी; गुरुकुंज येथे सात लाख गुरुभक्तांची गर्दी

लाखो भाविक वाहणार मौन श्रद्धांजली


अमरावती : 'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे' असं म्हणत अख्ख्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj) यांची आज ५५वी पुण्यतिथी आहे. देश गुलामगिरीत असताना राष्ट्रसंतांनी कीर्तनाच्या (Kirtan) माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. गावागावात कीर्तन करून राष्ट्रभक्ती जागृत केली. ग्रामोन्नतीचा मार्ग दाखविला. महाराजांचा अश्विन वद्य पंचमी हा पुण्यतिथी दिन. यानिमित्त मोझरी येथे त्यांनी स्थापन केलेल्या आमरावतीतील गुरुकुंज (Gurukunj) येथील आश्रमात देशविदेशातून लाखो गुरुभक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार आहेत.


आज गुरुकुंज येथे दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. याकरता ५ ते ६ देशांतील विदेशी भक्त दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी दाखल झाले आहेत. पहाटे चार वाजल्यापासून लाखो भाविकांनी गुरुकुंज येथे तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थनासुद्धा घेण्यात येणार आहे.


गुरुकुंज येथील ट्रस्टचे अध्यक्ष म्हणाले, 'आजच्या दिवशी भारतातूनच नव्हे तर विदेशातून जवळपास सात लाखांच्या आसपास लोक येतात. दरवर्षी यानिमित्त मौन श्रद्धांजली आणि सर्वधर्मीय प्रार्थनेचा कार्यक्रम करण्यात येतो'.



कशी वाहिली जाते मौन श्रद्धांजली?


गुरुकुंजातील पुण्यतिथी महोत्सवातील लगबग आज दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्तब्ध होणार आहे. यावेळेस महाद्वारावरील विशालकाय घंटेचा निनाद झाल्यावर महासमाधीच्या दिशेने भाविक जेथे असेल तेथे दोन मिनिटे थांबून हात जोडून मौन श्रद्धांजली अर्पण करतात.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये