Maratha andolan : मराठा आंदोलन पेटलं! छत्रपती संभाजीनगरात भाजप आमदारांचं कार्यालय फोडलं

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलन (Maratha andolan) चिघळलं असून अद्याप यावर तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक चांगलेच पेटून उठले आहेत. बीडमध्ये (Beed) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांचं घर तर माजलगाव नगरपरिषदही (Majalgaon Nagarparishad) पेटवण्यात आली. या घटना ताज्या असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधूनही (Chhatrapati Sambhajinagar) मराठा आंदोलक आक्रमक झाल्याची माहिती आहे. भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचं गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडलं आहे. त्यामुळे संभाजीनगरात खळबळ उडाली आहे.


प्रशांत बंब यांच्या कार्यालयात अचानक घुसलेल्या मराठा आंदोलकांनी कार्यालयातील सामानाची नासधूस केली. काचा फोडल्या, तसेच खुर्च्या देखील तोडल्या आहेत. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या