खेळाडू, कायदेतज्ञ, कलाकारांचे लाच विरोधी अभियान , शर्मिला वालावलकर यांची आयडियाची कल्पना

Share

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक परीक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनातील लाचखोरीला चांगलाच पायबंध घालण्याची मोहीम छेडली आहे. साधारण वर्षभराच्या कालखंडात शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच खोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकात वेसण घालताना तब्बल दिड शतक पुर्ण केले असल्याने मुघल सरदारांच्या घोडयांना पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचे तसे प्रशासनातील लाचखोरांना आणि त्यांच्या दलालांना शर्मिष्ठा वालावलकर आणि त्यांचे पथक दिसू लागले आहेत.

दीडशेच्या आसपास सापळे यशस्वी होऊन देखील आडमार्गाने लाच खोरी सुरूच असल्याची बाब वालावलकर यांच्या लक्षात आल्यानंतर जन जागृतीचा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला. समाजाचे मन परिवर्तन केल्या शिवाय ही लाचखोरी थांबणार नाही हे हेरून समाज ज्यांचे अनुकरण करतो, ज्यांना समाजात आदराचे स्थान आहे असे खेळाडू, कायदे तज्ज्ञ, कलाकारांची मदत घेऊन त्यांनी लाच देणे आणि घेणे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने समाजाने त्यापासून परावृत्त व्हावे असे आवाहन केले आहे.

इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर आपोआप मार्ग सापडतो याचेच हे उदाहरण. अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगिरकर, विद्या करंजीकर, किरण भालेराव, प्रार्थना बेहरे हे चित्रपट कलाकार, कब्बडी पटू आकाश शिंदे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, ऍड नितीन ठाकरे, हिवरगावचे सरपंच पोपटराव पवार आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

Tags: Nasik

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

1 hour ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

2 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

2 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

3 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

3 hours ago