ST Bus : एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा! पगारातून दोन हजार रुपये कपातीचा निर्णय मागे

  126

कर्मचाऱ्यांच्या एकसंघ विरोधाचा परिणाम


नाशिक : एस टी बँकेत रुपया निधीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून २ हजार रुपये कापण्याचा निर्णय एस टी बँकेकडून घेण्यात आलेला होता. परंतु हा निर्णय अखेर मागे घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


कर्मचाऱ्यांचा विरोध पाहता एस टी.को. ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने काल हा निर्णय मागे घेतला आहे. बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक बँक सभासदांच्या मासिक वेतनातून काही ठरवलेली रक्कम कापण्यात येते. ती जमा केलेली रक्कम 'रुपया ठेव निधी' या योजनेमध्ये समाविष्ट केली जाते. जेवढी रक्कम होईल त्यावर कर्मचाऱ्यांना वार्षिक व्याज दिले जाते.


सध्याच्या पगारातून कर्मचाऱ्यांची १०० रुपयापासून ५०० आणि ५०० ते १००० अशी रक्कम कापण्यात येत होती. मात्र, पुढील वेतनामधून थेट २००० रुपये कपात करण्यात येणार होती. ती आता रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.