Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने सर्वांसमक्ष संपवले जीवन

जरांगे यांच्याशी बोलण्याची व्यक्त केली होती इच्छा


बीड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता वेगळेच रुप धारण करु लागला असून यामध्ये अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आंदोलनात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावर आता सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे, अन्यथा हजारोंच्या संख्येने लोक उपोषण करतील, असं विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान, काल रात्रीच बीडमधील (Beed News) एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची (Suicide case) धक्कादायक घटना घडली आहे.


बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. यावेळेस तेथील उपस्थितांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता त्याने अखेर उडी मारुन आपलं जीवन संपवलं. काल रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शत्रुघ्न काशीद असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.


मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शत्रुघ्न गुरुवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते ताबडतोब हजर झाले व शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

Nashik: 'कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव'

नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ