मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) याचिका दाखल करुन आरक्षण रद्द करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Lawyer Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तीन आरोपींना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मराठा समाजाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गौप्यस्फोट करत उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नितेश राणे म्हणाले, जी मुलं काल मातोश्रीच्या बाहेर फिरताना दिसत होती तीच आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडताना दिसली. त्यामुळे त्या मुलांच्या कॉल रेकॉर्डिंग्जची तपासणी करण्यात यावी. त्यांच्या टॉवर लोकेशनची तपासणी व्हायला हवी. काल अगर ही मुलं मातोश्रीवर उपस्थित होती आणि आज ती गाडी तोडताना दिसत असतील तर गाडी तोडताना त्या ठिकाणी कॅमेरामॅन कसे उपस्थित असू शकतात? म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का? असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, एका बाजूला मनोज जरांगे सातत्याने आवाहन करत आहेत की आपण शांततापूर्ण आंदोलन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मराठा समाज प्रत्येक गावात शांततेने आंदोलन करतो आहे. मराठ्यांनी ५८ मोर्चे काढले पण एकाच्याही केसाला धक्का लावला नाही. त्यांच्या प्रत्येक मोर्च्यामध्ये बाजूने अॅम्ब्युलन्स जात असेल, तर तिला लगेच वाट करुन दिली जायची. याच मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम मातोश्रीवर शिजतोय का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले, सातत्याने २४ ऑक्टोबरनंतर दंगली होऊ शकतात, असं कोण म्हणतं? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. आम्ही वारंवार सांगतो की महाराष्ट्रात दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा मोठा हात आहे. मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. आजच्या घटनेमुळे हे पुन्हा सिद्धदेखील झालं आहे. त्यामुळे आज गाडी तोडणारे कार्यकर्ते काल मातोश्रीवर काय करत होते, याचा तपास झालाच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…