माजी आमदार संजय पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, मनमाडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार

मनमाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची भुजबळांच्या भूमिकेवर नाराजी


मनमाड (प्रतिनिधी) - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(chagan bhujbal) यांना मनमाड शहरात धक्का बसला असून मराठा आरक्षण भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मंत्री भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. भुजबळ यांच्यामुळे मिळालेले मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही सोडचिट्टी दिल्याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आज जाहीर केली.


भुजबळांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कामकाज करताना मंत्री सहकार्य करीत नसल्याचा आरोपही माजी आमदार संजय पवार यांनी केला असून सध्या तरी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही यापुढे शेतकरी हिताचे राजकारण करू अशी भूमिकाही माजी आमदार पवार यांनी व्यक्त केली आहे.


शेतकरी घरातून जन्माला आल्यामुळे शेतकरी हिताची सर्व निर्णय योग्य रीत्या मार्केट कमिटीत घेतले असून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नसून विरोधकांवर जोरदार टीका सत्र सोडले व कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करत असताना आपल्याला संचालक मंडळ कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसून वेळोवेळी आपल्या विरोधात अर्ज फाटे करून कामांना अडवणूक करत असल्याने आपण यात नाराज आहोत.म्हणून आपण आपल्या सभापती पदाचा राजीनामा देत आहे माझ्यासोबत आहेर विठ्ठल काशिनाथ असून पुढील भूमिका वेळ आल्यावर स्पष्ट करणार.


तसेच पुढे बोलत असताना माजी आमदार पवार यांनी माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्यावरही खालच्या थराला जाऊन जोरदार टीका सत्र सोडत दंड थोपटले आहेत.


मी आज राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत असून त्या मागचे कारण मराठा आरक्षण भूमिकेबद्दल भुजबळ यांनी विरोध दर्शवला असून तो विरोध दर्शवला नको होता व बाजार समितीतील संचालक मंडळ आपल्याला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसून आपण आपल्या सभापती पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे हे काम करत असताना मला सहकार्यांनी व धात्रकांनी वेळोवेळी विरोध दर्शवला असून आपण त्यांना आवाहन करत आहोत की मी वेळ आल्यास माझी भूमिका स्पष्ट करणार. - संजय सयाजी पवार.(माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती)

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे