Beed Ambulance Accident : रुग्णाला इस्पितळात नेण्याआधीच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चालकासह चार जणांचा मृत्यू

बीडमधील दुर्घटना


बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेचा (Ambulance) भीषण अपघात (Beed Accident News) झाला आहे. रुग्णाला इस्पितळात पोहोचवण्याआधीच काळाने घाला घातला. रात्री बाराच्या सुमारास दौलावडगावच्या दत्तमंदिराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकची (Truck) धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की यात चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


रुग्णवाहिका दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ पोहोचली असतानाच एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता. व्यंकटेश कंपनीजवळ डाव्या बाजूने वळण घेत असतानाच ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असल्याने रुग्णवाहिकेचा वेग देखील अधिक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


थेट समोरचा भाग ट्रकवर जाऊन धडकल्याने चालक लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.


रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात सांगवीपाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (वय ३५ वर्षे, रा.धामणगाव) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरपुडे (दोन्ही राहणार जाटदेवळा) असा चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, एका जखमीवर उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड हादरले : मणक्याचे ऑपरेशन झालेल्या महिलेचा डॉक्टराकडूनच विनयभंग!

पिंपरी-चिंचवड : वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील (Pimapari- Chinchwad) आकुर्डी (Akurdi)

Ahilyanagar : जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ! पाणीसाठा घसरला अवघ्या २४.५४ टक्क्यांवर

अहिल्यानगर : जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने जूनच्या पहिल्याच आठवड्यात तळ गाठला असून, एकूण साठा

IAF Officer Wife Video : धक्कादायक! हवाई दल अधिकाऱ्याच्या पत्नीचा बलात्कार, ब्लॅकमेल आणि सक्तीच्या धर्मांतराचा आरोप

नागपूर : नागपुरात (Nagpur) एका २४ वर्षीय महिलेने तिच्या जुन्या वर्गमित्रासह तिघांविरुद्ध बलात्कार (Rape), ब्लॅकमेल (Blackmail),

Pratap Sarnaik : आता प्रत्येक ५० किलोमीटरवर 'आरटीओ ऑफिस'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

- कमी लोकसंख्येच्या ठिकाणी चार तालुक्यांना एकत्र सेवा मुंबई : राज्यातील वाढती वाहनसंख्या आणि नागरिकांची गरज

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा