Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीBeed Ambulance Accident : रुग्णाला इस्पितळात नेण्याआधीच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चालकासह चार...

Beed Ambulance Accident : रुग्णाला इस्पितळात नेण्याआधीच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चालकासह चार जणांचा मृत्यू

बीडमधील दुर्घटना

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेचा (Ambulance) भीषण अपघात (Beed Accident News) झाला आहे. रुग्णाला इस्पितळात पोहोचवण्याआधीच काळाने घाला घातला. रात्री बाराच्या सुमारास दौलावडगावच्या दत्तमंदिराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकची (Truck) धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की यात चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रुग्णवाहिका दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ पोहोचली असतानाच एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता. व्यंकटेश कंपनीजवळ डाव्या बाजूने वळण घेत असतानाच ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असल्याने रुग्णवाहिकेचा वेग देखील अधिक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

थेट समोरचा भाग ट्रकवर जाऊन धडकल्याने चालक लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात सांगवीपाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (वय ३५ वर्षे, रा.धामणगाव) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरपुडे (दोन्ही राहणार जाटदेवळा) असा चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, एका जखमीवर उपचार सुरु आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -