Investment करताय तर मोदी सरकारच्या या योजना आहेत हिट, व्याजही मिळते जबरदस्त

Share

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही पैसे वाचवून अशा ठिकाणी गुंतवतात जेथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. सोबतच चांगले व्याजदरही मिळेल. यामुळे छोट्या बचत योजनांना लोकांची मोठी पसंती मिळत आहे. हे काही आम्ही सांगत नाही आहोत तर गुंतवणकीचे आकडेच तुम्हाला सगळं काही सांगतील.

मोदी सरकारने छोट्या बचत योजनांबाबत उचलेलल्या पावलांचा हा परिणाम पाहायला मिळत आहे. खासकरून वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना दमदार व्याज मिळत आहे. वरिष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच सीनियर सिटीजन सेव्हिंह स्कीममध्ये लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

एप्रिलपासून आतापर्यंत २.५ पटींनी गुंतवणूक वाढली

रिपोर्टनुसार, एप्रिल-सप्टेंबर सहामाहीत सीनियर सिटीझन्स सेव्हिंग स्कीममध्येच केवळ गुंतवणूक वाढली नाही तर महिलांसाठी चालवण्यात आलेल्या छोट्या बचन योजनांमधील गुंतवणुकीचा आकडाही वाढला आहे. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी डिपॉझिट दरवर्षी २.५ पटींनी वाढत आहे. आता हे वाढून ७४, ६२५ कोटी रूपये इतके झाले आहे. एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार वर्षभराआधी इतक्याच कालावधीत एकूण गुतवणूक २८,७१५ कोटी रूपयांची वाढ पाहायला मिळाली. म्हणजेच यात तब्बल १६० टक्क्यांहून जास्त वाढ झाली.

वरिष्ठ नागरिकांना मिळतेय इतके व्याज

सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेत चांगले व्याजदर मिळत आहे. यात व्याजदर जून तिमाहीत ८ ट्क्यांवरून वाढून ८.२ टक्के झाले होते.

महिलांसाठीच्या स्कीममध्ये जोरदार गुंतवणूक

एकीकडे वरिष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जात असताना महिलांसाठी सुरू केलेल्या बचत योजनांनाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतही महिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सप्टेंबर तिमाहीत यातील गुंतवणूक वाढून १३,५१२ कोटी रूपये झाली. ही योजन दोन वर्षांसाठी आहे. यात मार्च २०२५ पर्यंत खाते खोलता येते. या योजनेत मिळणारे व्याजदर ७.५ टक्के इतके आहे.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

12 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

36 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

2 hours ago