एनसीईआरटीच्या पुस्तकात आता 'इंडिया' ऐवजी 'भारत'!

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटीच्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी 'भारत' शब्द येणार आहे.


एनसीईआरटीने त्यांच्या अभ्यासक्रमातून, पाठ्यपुस्तकातून 'इंडिया' शब्द हटवून त्याजागी 'भारत' शब्द घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात संबंधित संस्थेकडून जी पुस्तके येतील त्यात इंडियाऐवजी भारत हा उल्लेख असेल, अशी माहिती त्या पॅनलमधील एका सदस्याने दिली आहे.


नाव बदलण्याच्या मागणीचे निवेदन हे गेल्या काही महिन्यांपूर्वी केली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. संस्थेकडून इंडिया हे नाव वगळून भारत हा शब्द वापरण्यात येईल का याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यावरुन सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांकडून अनेक मतमतांतरं समोर आली होती. जी-२०च्या वेळेस देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा न करता प्रेसिडेंट ऑफ भारत असा केला होता.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने