लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने हा आदेश दिला असून यापूर्वी २६ डिसेंबर रोजी न्यायालयाने यासिर अहमद दार याला एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन आणि तपास यंत्रणांच्या कोठडीत आहेत. या स्फोटप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुरू आहे.



आत्मघाती बॉम्बर बनवण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा आरोप


या प्रकरणाशी संबंधित आणखी एक आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला १८ नोव्हेंबर रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने एनआयए कोठडी सुनावली होती. एनआयएने दानिशला श्रीनगरमधून अटक केली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी दानिशने ड्रोनमध्ये तांत्रिक बदल केल्याचा आणि रॉकेट असेंबल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.


एनआयएच्या म्हणण्यानुसार, दानिशने कथित आत्मघाती बॉम्बर उमर नबीसह संपूर्ण कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यशास्त्रात पदवीधर असलेल्या दानिशचा उमर नबीने आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये तो कुलगाम येथील एका मशिदीत डॉक्टर मॉड्यूलला भेटण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर त्याला हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात राहण्यासाठी नेण्यात आले.



लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये स्फोट


१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ एका चालत्या कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. ही कार कथित आत्मघाती बॉम्बर उमर उन नबी चालवत असल्याची माहिती एनआयएच्या फॉरेन्सिक तपासातून समोर आली आहे.


उमर उन नबी हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होता. तो फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. या स्फोटप्रकरणाचा तपास एनआयएने अधिक तीव्र केला असून, आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Delhi High Court : 'लंच ब्रेक'मध्ये झालेला अपघातही कामाचाच भाग, कर्मचारी भरपाईस पात्र

नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत

US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त