जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते बालिकांचा सन्मान

जिल्हा शासकीय रूग्णालयात ‘स्त्री जन्माचे’ आनोखे स्वागत


नाशिक (प्रतिनिधी)- जिल्हा शासकीय रूग्णालय नाशिक येथे 23 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवात अष्ठमीच्या दिवशी रात्री बारा वाजेनंतर ज्या मुलींनी जन्म घेतला, त्या मुलींच्या आई, वडील आणि नवजात बालिकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.


या सोहळ्यास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी, स्त्रीरोग तज्ञ विभाग प्रमुख पदव्युत्तर महाविद्यालय डॉ. किरण पाटोळे, डॉ. उत्कर्ष दुधाडीया, डॉ.रोहन बोरसे, डॉ.प्रतीक भांगरे, डॉ.बाळू पाटील, मेट्रेन शुभांगी वाघ, ॲङ सुर्वणा शेफाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हाडपे, जिल्हा रूग्णालयातील अधिकारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.


स्त्री जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयातील पी.सी.पी.एन.टी.डी कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी ४ मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसूती कक्ष रांगोळी, तोरण, फुगे लावून सजविण्यात आला होता. नवजात बालिकांच्या मातांना साडी, ओटी भरण करून औक्षण करण्यात आले.


नवजात बालिकांना नवीन कपडे व त्यांच्या वडीलांना शाल देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जन्म झालेल्या पालकांना शुभेच्छा देवून स्त्री जन्माचे स्वागत आनंदाने करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये