मुंबई: राज्यात आज सर्वत्र विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. मुंबईतही या दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेचा मेळावा असतो. राज्यात आज दसऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची शिवसेना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना हे दोनही गट आज मेळावा घेत आहेत. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे.
दोन्ही गटांचा दावा आहे की त्यांच्या मेळाव्यात लाखोच्या संख्येने समर्थनक येतील. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.
गेल्या सहा दशकांपासून शिवसेना दसऱ्याच्या निमित्ताने मेळावा आयोजित करते. दरम्यान, गेल्या वर्षी पक्षात फूट पडल्यानंतर दोन गट बनले आणि दोन गटांचे दोन वेगवेगळे मेळावे असणार आहेत. दोन्ही गटांचे मेळावे लक्षात घेता मुंबईत पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
मेळाव्यात सामील होण्याचे आवाहन
या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे गटाने या दसऱ्यातील मेळाव्यात एक पक्ष, एक विचार आणि एक मैदान असा नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने आझाद मैदानावरील मेळाव्याची तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द आझान मैदानात हजेरी लावली आणि तयारीचा आढावा घेतला. याशिवाय त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मेळाव्याबाबतचे महत्त्वाचे आदेशही दिले.
याबाबत फेसबुक पोस्टमध्ये शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही काही वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वितार पुढे नेत आहोत. शिंदेंनी लिहिले, उद्या या आझाद मैदानातून शिवसेनेची पुन्हा एकदा गर्जना ऐकू येईली. यावेळी माजी मंत्री विजयबापू शिवतारे आणि पक्षातील प्रमुख सहकारी उपस्थित राहतील.