जत : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे पुढारी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमला आता केवळ एक दिवस उरला आहे. यानंतर मराठा समाज आणखी पेटून उठण्याची शक्यता आहे. यात खेदाची बाब म्हणजे मराठा युवक आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) करत आहेत. मुंबई, बीड, नांदेड या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावे म्हणून तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना घडल्या. यानंतर आता धनगर समाजही (Dhangar Samaj) आक्रमक झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील जत तालुक्यातील एका युवकाने धनगरांना आरक्षण मिळावे म्हणून शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.
बिरुदेव वसंत खर्जे असं ३८ वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. तो जत तालुक्यात कुणीकोनूरमध्ये आबाचीवाडी येथे राहणारा होता. काल संध्याकाळी त्याचा मृतदेह शेतात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. बिरूदेवने धनगर आरक्षण मिळावे, माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरू नये व माझ्या कुटुंबाला कशाचा त्रास होऊ नये, अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवून आपल्याच शेतात झाडाला गळफास घेतला. बिरुदेवची मुलगी शेताकडे पाण्याची मोटार बंद करण्यास निघाली होती. तिने बिरुदेवचा मृतदेह झाडावर पाहिला. मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली.
नागरीक व पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. जत तालुक्यातील धनगर समाजबांधव रुग्णालयाजवळ जमले होते. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. मात्र पोलीस उपअधीक्षक सुनील शेळके यांनी प्राथमिक तपासात आरक्षणाच्या मागणीसाठी घटना घडल्याचे समोर आल्याचे सांगितले, त्यानंतर नोंद करण्यात आली. बिरुदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…