नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनाचे दिवसेंदिवस तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. आंदोलनकर्त्यांचे पुढारी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वावर मराठ्यांचा विश्वास वाढत चालला असून बीडमध्ये रात्री १२ वाजता झालेल्या सभेलाही मराठे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण आपलं जीवन संपवत आहेत. मुंबईत एका ४५ वर्षीय सुनील कावळेंनी गळफास लावून आत्महत्या केली तर बीडमध्येही जगन्नाथ काळकुटे नामक एका युवकाने आत्महत्या केली. या धक्कादायक घटनांनंतर आता नांदेडमधूनही मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची (Suicide Case) बातमी समोर आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मराठे प्रचंड पेटून उठल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे.
हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. शुभम सदाशिव पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. ‘एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या जवळ आढळून आली. त्यामुळे मराठा आरक्षण मिळावे याकरता या तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
अर्धापूर येथील तामसा रोड वरील नरहरी मंगल कार्यालयाच्या बाजूला शुभमचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी अर्धापूर पोलिसांनी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी केशव पवार यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मस्के करत आहेत.
हदगावमध्ये राहणारा शुभम प्लंबरचं काम करता करता शिक्षणही घेत होता. काल शनिवारी सकाळी तो रेल्वेने मुंबई येथून नांदेडला आला. नांदेडच्या नमस्कार चौक परिसरात राहणार्या बहिणीला भेटून मग घरी येतो, असे त्याने वडिलांना फोन करुन कळवले. परंतु संध्याकाळी सात वाजले तरी शुभम घरी आला नाही. फोन लावला असता त्याने फोनही उचलला नाही. नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. तामसा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
त्यावेळी पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन चेक केले असता अर्धापूर परिसरात मोबाईल लोकेशन आढळून आले. शोध घेतला असता शुभम हा अर्धापूर येथील तामसा रोड वरील नरहरी मंगल कार्यालयाच्या बाजूला झाडीमध्ये आढळून आला. त्याच्या जवळ विषारी औषधाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळली. ज्या चिठ्ठीमध्ये ‘एक मराठा लाख मराठा’ , मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे, माझे हे बलिदान वाया जावू नये. मी शुभम सदाशिव पवार’, असा मजकूर आढळून आला.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…