Marathi serial : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’त नवा ट्वीस्ट;


  • ऐकलंत का! : दीपक परब


'सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही या छोट्या पडद्यावरील मालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन केले आहे. आता या मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा जन्म होणार आहे.


पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला बेघर होऊ देत नाही. तिला घरातच राहू दिले जाते. पण इंद्राणीला काहीतरी चुकल्यासारखे वाटते, अशातच एके दिवशी द्विधा मनस्थितीत असताना इंद्राणीला साधू भेटतात, जे तिला लहानपणीही भेटले होते. ते तिला सांगतात त्रिनयना देवीने तुझ्यावर नेत्राला वाचवण्याची जबाबदारी सोपवली आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी हे पाहिले की आपल्या वरदानाचा उपयोग करून नेत्राने अव्दैतचा मृत्यूयोग टाळला आहे. परंतु त्रिनयना देवीचे वरदान असलेल्या स्त्रियांसाठी असलेले नियम नेत्राने मोडले आहेत.एके दिवशी नेत्राच्या नाकातून रक्त येऊ लागते. आता कदाचित पुढील मृत्यू नेत्राचाच होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इंद्राणी नेत्राला सांगते की त्रिनयना देवी ग्रंथ वाचला तर काहीतरी मार्ग सापडेल. पण त्याचवेळी भालबा येऊन सांगतात, की त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा मंदिरात ठेवला तर नेत्राचा मृत्यूयोग कदाचित टळू शकतो. भालबा नेत्राला सूचना देतात की ग्रंथ मंदिरात ठेवण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पानावर हळदीकुंकू लाव आणि देवीचा मंत्र म्हण. भालबांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा ग्रंथाला हळदीकुंकू लावत असताना ग्रंथावर तिच्या डोळ्यातील अश्रू पडतात आणि त्यातून पंचपिटिका हा शब्द उमटतो. काय असेल हे पंचपिटिका रहस्य, त्याचा शोध नेत्रा कसा घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मालिका पाहावी लागणार आहे. ' या मालिकेतील नवे ट्वीस्ट जाणून घेण्यासाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आनंद सोहळा

- परंपरा, द. वि. अत्रे ग्यानबा तुकाराम’ अन् ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ हा नामघोष लाखो वारकऱ्यांच्या तोंडून ऐकायचा

आषाढ... परंपरेतला अन् प्रत्यक्षातला

- चिंतन; डॉ. साधना कुलकर्णी आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. इतर

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

- स्मृतीपटल; अनिल तोरणे कोणा व्यक्तीला केव्हा आणि कोठे कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येणार नाही. सुप्रसिद्ध

‘अबके हम बिछड़े तो शायद…’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे उर्दूतील शेरोशायरी अनेकदा रोमांसमधील अगदी तरल भावनांच्या सूक्ष्म छटाही सहज

नर्मदातीरावरील तीर्थांचा महिमा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भारतातील गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांपैकी नर्मदा नदीच्या केवळ

संकोच नव्हे, संवाद हवा!

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू आजही अनेक पालक मुलांशी लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे टाळतात. काहींना संकोच वाटतो,