Raj Thackeray Interview : पुणे बरबाद का झालं?

  150

पुण्याच्या मुलाखतीत राज ठाकरे यांचं रोखठोक भाष्य


पुणे : आज जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर (Deepak karanjikar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. यावेळी 'राज्यकर्त्याला सौंदर्यदृष्टी असावी लागते तरच शहरे सुंदर दिसतात' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. याचबरोबर त्यांनी प्रश्नांची उत्तरे देताना टाऊन प्लानिंग, आर्किटेक्ट्सना आपल्याकडे दिलं जाणारं कमी महत्त्व अशा मुद्दयांवर भाष्य केलं.


राज ठाकरे म्हणाले, मुंबई दर्शनच्या बसेसमध्ये तुम्ही गेलात तर तारापोरवाला मत्स्यालय सोडून सर्व ब्रिटीशकालीन वास्तू दाखवल्या जातात. नवीनमध्ये केवळ शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानचं घर याच गोष्टी असतात. कधी वेळ मिळाला तर शिवाजी पार्क, दादर, माहिम, परळ, नायगांव, वडाळा याचा टॉप व्ह्यू बघा. याचा संपूर्ण टाऊन प्लानिंग ब्रिटिशांच्या काळातील आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही. किती लोकसंख्या असली पाहिजे आणि त्या लोकसंख्येला लागणार्‍या गोष्टी कोणत्या याचा विचार झाला पाहिजे.


लोकांना लागणार्‍या गोष्टींमध्ये मार्केट, थिएटर, शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, बागा या अगदी ठराविक गोष्टी असतात, त्या तुम्हाला सांगाव्या लागतात? आज तुम्ही तेच मुंबईचं टाऊन प्लानिंग जे ब्रिटीशकालीन आहे ते बघा, त्यांनी तर परळला एक हॉस्पिटलचा हब उभा केला. पण स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत अशा गोष्टी कुठे झाल्या? कुठे अशा प्रकारचे हब उभे राहिले? कुठे हॉस्पिटल्स उभे राहिले? आणि आता तर जेवढं काही सरकारने उभं केलं आहे त्या सगळ्याचं खाजगीकरण होतंय. पण जे परदेशात होतं असं काहीही आपल्याकडे होत नाही. त्यामुळे तुम्ही राजकर्त्यांशी बोललं पाहिजे, असं तिथे उपस्थित आर्किटेक्टसना उद्देशून राज ठाकरे म्हणाले.



पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही


मी गेले २५ एक वर्षे पुण्यात येतोय. पुण्यात ही गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणातून सांगितली आहे. मुंबई बरबाद व्हायला एक काळ गेला. पुणं बरबाद व्हायला वेळच लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलं आहे? पाच पाच पुणे आहेत. एक हिंजवडीचं वेगळं, नदीकाठचं वेगळं, विमाननगरचं वेगळं असं पुणे झालं आहे. पुणे म्हणून कुठं राहिलंय? याचं कारण म्हणजे राज्यकर्त्यांचं शहरांकडं लक्षच नाही. टाऊनप्लानिंगचं कोणाला काही घेणं देणं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणाची वार्ता पोचवणारे दामूदा मोरे यांचे ९२ व्या वर्षी निधन

नागपूर : बाबासाहेब चळवळीतील दामूदा शिवाजी मोरे यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने

Indigo bird strike flight : क्षणात घेतला यू-टर्न! IndiGo विमानाला पक्षी धडक; पायलटच्या निर्णयामुळे २७२ प्रवासी...

नागपूर  : नागपूर विमानतळावर आज एक मोठी घटना घडली. इंडिगो एअरलाईन्सचे नागपूर-कोलकाता हे विमान (फ्लाईट नंबर ६E८१२)

Beed News : मराठा आंदोलकांवरील लहान गुन्हे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; पाच लाखांखालील नुकसानाचे गुन्हे रद्द करण्यास हिरवा कंदील

बीड : बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या मागे घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग

धक्कादायक बातमी! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या, काय आहे प्रकरण?

बीड: परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे (Sunil Nagargoje) यांनी गळफास घेऊन

CM Devendra Fadnavis: आंदोलनासंबंधीचा तोडगा लवकरच निघेल पण त्यासाठी संवाद गरजेचा - मुख्यमंत्री

पुणे: आंदोलनासंबंधीचा तोडगा लवकरच निघेल, पण त्यासाठी संवादाची गरज आहे. आंदोलनातून मराठा समाजाच्या हिताचे निर्णय

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस