मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत(aamir khan) मोठी बातमी समोर आली आहे. हा अभिनेता लवकरच मायानगरी मुंबईला अलविदा म्हणणार आहे. असे सांगितले जात आहे की पुढील दोन महिन्यांत आमिर खान चेन्नईला शिफ्ट होईल. चेन्नईला शिफ्ट होण्यामागचे सगळ्यात मोठे कारण त्यांची आई जीनत हुसैन आहे.
इंडिया टुडेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितले की आमिर खानसाठी त्यांचे कुटुंब सर्वात आधी आहे. त्याची आई चेन्नईमध्ये राहते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आमिरला आपला पूर्ण वेळ आईसोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की ज्या रुग्णालयात आमिर खानच्या आईवर उपचार सुरू आहत त्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये हा सुपरस्टार राहणार आहे. आमिर खान कामासोबत आपल्या कुटुंबालाही वेळ देतात. तो आपल्या मुलीच्याही अतिशय जवळ आहे.
आमिरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास नुकताच त्याच्या सितेरा जमीन पर या सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमामध्ये ९ मुलांची कहाणी दाखवली जाईल ज्यांना अनेक प्रकारचे त्रास असतात. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४मध्ये रिलीज होणार आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…