Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने धरला तारपा नृत्यावर ठेका

Share

विश्वास फाउंडेशनमार्फत रास रंग गरब्याचे आयोजन

बोईसर : नवरात्रीच्या गरबा उत्सवात प्रथमच आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या तारपा लोककलेची झलक विश्वास फाउंडेशनमार्फत आयोजित बोईसर रास रंग २०२३ च्या गरबा आयोजनात दिसली. सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने या कार्यक्रमाला हजेरी लावत तारपा नृत्यावर चांगलाच ठेका धरला.

स्थानिक आदिवासीनृत्य समूहासह सईने (Sai Tamhankar) तारपाचा मनमुराद आनंद लुटला. प्रथमच सई पालघर जिल्ह्यात आली होती. पालघरकरांच्या मिळालेल्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे सईने यावेळी म्हटले व उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

विश्वास फाउंडेशनमार्फत बोईसर सर्कस मैदानात बोईसर रास रंग २०२३ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दररोज पारंपरिक गरबा संगीताच्या तालावर हजारो गरबा प्रेमी या नवरात्र उत्सवाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. या कार्यक्रमातून बोईसरवासीयांसाठी एक आनंद देता आल्याचे समाधान विश्वास फाउंडेशनचे डॉ. विश्वास वळवी यांनी व्यक्त केले.

या गरबा कार्यक्रमात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, छोट्या व मोठ्या पडद्यावरील सिने तारका, अभिनेते, राजकीय मंडळी भेटी देत आहेत. दररोज रास गरबामध्ये अनेक गायक विविध प्रकारची गरबा गाणी गाऊन आपली छाप श्रोत्यांवर पाडत असले तरी या गरब्याच्या आदिवासी लोकसंस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या तारपा वाद्याच्या तालामुळे उत्सवाला व गरबा नृत्य करणा-यांना पसंती मिळत आहे. आदिवासी संस्कृतीची छटा, गाणी या कार्यक्रमात वाजवली जात असल्याने या कार्यक्रमात जिल्ह्याच्या संस्कृतीची छाप पडत असल्याचे वळवी यांनी म्हटले आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

31 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

32 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

39 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

43 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

52 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

55 minutes ago