नाशिक : ड्रग्स प्रकरणात मागे पालकमंत्री, आमदार व पोलीस प्रशासनावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता यामध्ये नाशिक मधील दोन माजी नगरसेवक व नगर सेविका पूत्र यांचा सहभाग असल्याच्या चर्चेला उधाण आले असून नेमके ते दोन माजी नगरसेवक व नगरसेविका पुत्र कोण ? याबाबत मात्र नागरिकांमध्ये तर्क वितर्क लावले जात आहे. त्यामुळे त्यांचा तपास करून त्यांचे नांव जनतेपुढे आणणे हे आता पोलीस आयुक्त यांच्या पुढे आव्हान ठरू पाहत आहे.
नाशिक शहर पोलीसांच्या हद्दीत घुसून मुंबई पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा हस्तगत केला आणि नाशिक पोलिसांची सर्वदूर नाचक्की झाली. विशेष म्हणजे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही अंतरावर हा ड्रग्सचा साठा सापडला. त्यानंतर जागे झालेले झोन २ चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपयांचा कच्चामाल एका गोडाऊनमध्ये मिळाला. त्यामुळे नाशिक पोलिसांची अब्रू काहीशी वाचली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची उचल बांगडी करत त्यांची कंट्रोल रूममध्ये रवानगी केली. त्यामुळे नागरिकांनी पोलीस आयुक्तांच्या या कारवाईवर काहीसे समाधान व्यक्त केले. तर वडाळा भागात सापडलेल्या ड्रग्स प्रकरणात एका आमदाराने गुन्हेगारांना सोडण्यासाठी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच दम भरल्याची घटना चर्चेत आली. त्यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणामधील गुन्हेगारांना सोडण्यासाठी पोलिसांना फोन करणारे ते आमदार कोण ? हे मला माहिती असून येत्या अधिवेशनामध्ये मी तो मुद्दा मांडणारा असल्याचे वक्तव्य करून एकच खळबळ निर्माण केली.
पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व खरे गुन्हेगार बाहेर आणावे असे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबर रोजी नाशिक मध्ये शालीमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यातच आता ललित पाटील हा सापडला असून तत्पूर्वी त्याने पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचे सांगितल्याने पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. मी पळून गेला नसून मला पळवण्यात आले आहे. असे त्यांने सांगितल्याने यामागे कोण कोण आहेत. याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. पण त्याचा तेलगी होऊ नये अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत . हे सर्व घडत असताना नाशिकममध्ये देखील या ड्रग प्रकरणामागे काही पोलीस तसेच दोन माजी नगरसेवक व माजी नगरसेविका पूत्र असल्याच्या चर्चांना उधाण आले असून ते नेमके कोण ? कोणत्या पक्षातले ? कोणत्या परिसरातले ? याबाबत नागरिकांमध्ये मात्र वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत . त्यामुळे याचा सखोल तपास करणे हे पोलिस आयुक्तांपुढे आता मोठे आव्हान ठरणार आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…