पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) वरुन राज्याचं राजकरण चांगलंच तापलेलं असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे आज सकाळीच ललितला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले तर दुसरीकडे येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) कैद्याकडे चक्कं चरस आढळून आलं आहे. शुभम पास्ते (Shubham Paste) नावाच्या कैद्याकडे हे चरस आढळलं आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.
शुभम पास्तेला एका गुन्ह्यामध्ये न्यायालयात हजर करायचं होतं. त्यानुसार त्याला येरवडा कारागृहातून पुण्याच्या सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. सुनावणी पार पडल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणलं गेलं. येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारावर त्याची तपासणी करण्यात आली. त्याच तपासणी दरम्यान त्याच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आलं. बंदोबस्तात असताना एवढं चरस आलं कुठून हा एक मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. याचं कारण म्हणजे, येरवडा कारागृहातील काही कैदी ससून रुग्णालयात ठाण मांडून होते. या ससून रुग्णालयातून हे कैदी त्यांचे कामं सुरळीत करत असल्याचं समोर आलं होतं. त्यातीलच एक ललित पाटील हा चक्क रुग्णालयातून राज्यात मोठं ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यानंतर ससूनमध्ये असणाऱ्या कैदींना परत कारागृहात पाठवण्यात आलं आहे.
पुण्यातून ललित पाटील नजरकैदेतून फरार झाल्यानंतर पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवलं गेलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा चक्क कैदेत असलेल्या आरोपीकडे ड्रग्ज आढळल्याने कारागृहात कैद्यांवरती खरंच लक्ष दिलं जातं का? त्यांनी त्या ठिकाणी कैद्यांना सुधारणेसाठी ठेवलं जातं का? की कारागृहच मोठ्या गुन्ह्यांचे केंद्र बनलेले आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…