प्रायव्हसी पुरवणाऱ्या ९ कॉफी शॉपवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई...

नाशिक:  नाशिक शहरातील कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवत सदर ठिकाणी अंमली पदार्थाचे - सेवन व अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. याअनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत पाहणी केली असता ०९ कॅफेमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्य रचनेत अतिक्रमण करून बदल केला असल्याचे निदर्शनास आले. सदर अंतर्गत रचनेमुळे अंमली पदार्थ सेवन तसेच महिलांविरोधी गुन्हे घडण्यास पोषक स्थिती निर्माण करण्यात आली होती.


सदर कॅफे शॉपवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे महानगरपालिकेस विनंती करण्यात आली होती. यानुसार कारवाईसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त पथके निर्माण करून अनाधिकृतपणे कंपार्टमेंट/पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरविणाऱ्या एकुण ०९ कॉफी शॉप मधील अनाधिकृत बांधकाम निष्काशित करण्यात आले. तसेच सदरच्या आस्थापणा महानगरपालिकेकडून सिल करण्यात आलेल्या आहेत.


कारवाई करण्यात आलेल्या आस्थापना :


१) सिझर कॅफे, हॉलमार्क चौक, कॉलेजरोड, नाशिक   २) यारी कट्टा, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक


३) कॅफे क्लासिक डे लाईट, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक हॅरीज  ४) किचन कॅफे, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक


५) लकिन कैफे, थत्ते नगर, गंगापुर रोड, नाशिक     ६) पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक


७) बालाज कॅफे टेरीया, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक  ८) मुरली कॅफे, रामराज्य सोसायटी, महात्मा नगर, नाशिक


९) मॅझिक वर्ल्ड कॅफे, पी. एम. पी. एस. कॉलेज जवळ, डि. के. नगर, नाशिक


सदरची कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पो आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ, गंगापूर रोड पो. नि श्रीकांत निंबाळकर सरकारवाडा पो. नि. दिलीप ठाकुर, मनपा उपायुक्त श्रीकांत पवार, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल,टाऊन प्लॅनिंगचे उप संचालक हर्षल बाविस्कर, हरिष चंद्रे, राजाराम जाधव, योगेश रकटे, विभागीय अधिकारी, म. न. पा. व पोलिस पथक यांनी केली असुन नाशिक शहरात यापुढे अशाच प्रकारच्या धडक कारवाया करण्यात येणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य