Rahul Narvekar : संजय राऊत प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस, त्याच्याकडे लक्ष का द्यावे?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टीका


मुंबई : गेले अनेक महिने प्रलंबित असलेला आमदारांच्या अपात्रतेचा (MLA disqualification) प्रश्न निकाली लागलेला नाही. शिवसेना व उबाठा (Shivsena Vs Ubatha) हे दोन्ही गट या निकालाची वाट पाहत आहेत. तर, संपूर्ण माहितीशिवाय निकाल देऊ शकत नाही, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतली आहे. मात्र, यावर उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. 'ज्या प्रकारे संजय राऊत विधानसभा अध्यक्षांवर टीका करत आहेत, त्याचा अर्थ ते त्यांना निकाल आमच्याच बाजूने लावा असा दबाव टाकत आहेत, याची माननीय कोर्टाने दखल घ्यावी', असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील संजय राऊतांना सुनावले होते. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनीही संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.


राहुल नार्वेकर म्हणाले, बिनबुडाचे आरोप ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला हवे तसे घडवून घ्यावे, याच हेतूने केले जातात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावे? आणि त्यांना का महत्त्व द्यावे? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावे? संजय राऊत यांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची त्यांना माहिती असती, तर असे वक्तव्य केले नसते. आपल्याला सांगितल्याप्रमाणे संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले.


दरम्यान, सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की, नेमके नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झाले आहे, ते जर समजले नाही, तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल? त्यामुळे सुनावणीनंतर जास्त स्पष्टता प्राप्त होईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच जे वेळापत्रक बनवले होते, त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करायची नव्हती. परंतु, केवळ हेतूपरत्वे एकूण दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी जर का असे आरोप केले जात असतील, तर या आरोपांची दखल घेत नाही आणि घ्यायची गरजही नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन