मुंबई : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी (Drug Trafficking Case) ईडीकडून (ED) मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विकणारा अली असगर शिराझी (Ali Asgar Shirazi) याच्या विरोधात ईडीकडून छापे टाकण्यात आले. अली असगर हा वाँटेड ड्रग्स लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी असल्याचे समजते. तसेच, शिराझी याच्यावर २०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे.
ड्रग तस्कर अली असगर शिराझी अंधेरी परिसरात वास्तव्याला असून त्याचे घर आणि ऑफिस याठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेने याच वर्षी मे महिन्यात शिराझीला अटक केली होती. कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डममध्ये ८ कोटी रुपये किमतींच्या केटामाइन आणि व्हायग्राची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अली असगर शिराझी या वाँटेड व्यक्तीला दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावरुन पकडण्यात आले होते. गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी आणि त्यानंतर त्याला यावर्षी ताब्यात घेण्यात आले आहे.
अली असगर शिराझीशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत आणि काही इतर ठिकाणी छापे अजुनही सुरू आहेत. या वर्षी मे महिन्यात अली असगरला अटक करण्यापूर्वी अँटी एक्सटॉर्शन सेलने (AEC) मार्चमध्ये शिराझीचा शोध सुरू केला आणि पोलिसांच्या पथकाने त्याच्या शोधासाठी जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि देशातील अनेक ठिकाणी भेट दिली. परंतु तो सतत त्याचे गंतव्यस्थान बदलत होता. अखेर पोलिसांच्या तावडीत तो सापडलाच.
एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य अली असगर शिराझी याला अटक केली होती.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं १५ मार्च रोजी अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम केटामाइन आणि २३ हजारांहून अधिक व्हायग्राची पाकिटं जप्त केली होती. केटामाइनची किंमत सात कोटी ८७ लाख रुपये, तर व्हायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती.
याप्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत असून, त्याच्यासह आणखी तिघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. कैलाश राजपूत याच्या टोळीतील अली असगर शिराझी हा महत्त्वाचा आणि टोळीची जबाबदारी असलेला सदस्य. गुन्हा दाखल झाल्यानंतर अली असगर शिराझी गायब झाला होता.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…