नाशिक : आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेत सिडकोतील सेंट्रल पार्क मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे उबाठाचे नगरसेवक चक्क दुसऱ्या दिवशी आरोप असलेल्या त्याच माजी नगरसेवकाच्या आयोजित कार्यक्रम प्रसंगी स्टेजवर एकत्र असल्याचा व्हिडिओ तेथील उपस्थित नागरिकांनी काढून तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांच्या ‘दुतोंडीपणा’वर समाजात चांगलीच टीकेची झोड उमटताना दिसत आहे.
उबाठा गटाचे नगरसेवक बाळा दराडे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका किरण दराडे यांनी सेंट्रल पार्क मधील कामात भाजपा माजी नगरसेवक मुकेश शहाणे व भाजपा आमदार सीमा हिरे यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सणसणीत आरोप करत पत्रकार परिषद गाजवली. एवढेच नव्हे तर भाजपा आ. सीमा हिरे या केवळ “ग्रीन जिम” आमदार आहेत, असाही आरोप केला. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
बाळा दराडे यांनी घेतलेली ही भूमिका सर्वसामान्यांना चांगलीच पटली होती. कारण पाच वर्षे होऊनही अद्याप सेंट्रल पार्कचे काम झाले नाही, नागरिकांसाठी व मुलांसाठी ते खुले होऊ शकले नाही, त्यामुळे कमालीची नाराजी पसरली होती. तसे विदारक चित्र देखील तेथे बघायला मिळत आहे. तसेच कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचंही वास्तव चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे बाळा दराडे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारे सहानुभूती निर्माण झाली होती. तर भाजपाच्या लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली होती.
परंतु असे असताना दुसऱ्याच दिवशी महाकाली चौकामध्ये आरोप असलेले तेच भाजपा माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या दांडियाच्या या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेमध्ये आरोप करणारे नगरसेवक बाळा दराडे प्रमुख अतिथी म्हणून अचानक प्रकट झाले. हे बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे बाळा दराडेंचा दुतोंडीपणा तेथे उपस्थित असलेल्या जनतेने ‘याचि देही याचि डोळा’ बघितला.
यासंदर्भात बाळा दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमची राजकीय भूमिका वेगळी आणि मित्रता वेगळी आहे. मला महाकाली सोशल ग्रुप ने निमंत्रण दिले. म्हणून मी प्रमुख अतिथी म्हणून गेलो. नंतर निघून आलो. पवन कातकडे यांचे निमंत्रण होते. आम्ही आजच आयुक्ताची भेट घेऊन सदर आरोपा संदर्भात पुढील कारवाई साठी चर्चा करुन निवेदन दिले आहे.
उबाठा गटाचे नगरसेवक बाळा दराडे हे नेहमीच स्टंटबाजी करत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. भाजपा वसंत स्मृती कार्यालयावरील दगडफेक, पाण्याच्या टाकीवरील शोले स्टाईल आंदोलन, बोकड बळी, रुग्णाची फी न देता हॉस्पिटल मधून पलायनाचे फेसबुक लाईव्ह असे एक ना अनेक उद्योग त्यांनी केले आहेत. त्यामागे सामाजिक भावना असली तरी प्रसिद्धीचा हपापलेपणा असतो. एवढं मात्र नक्की!
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…