पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री धावत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता आहे.
या मार्गावर एका कंटेरनने दुसऱ्या कंटेनला धडक दिली. यामुळे एका कंटेनरने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यात कंटेनरचे केबिन जळून खाक झाले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारासस मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रंकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे कंटेनर पलटी झाला. या ट्रकने आणखी एका गाडीला धडक दिल्यामुळे या ट्रकला आग लागली.
यावेळी केबिनमधील सहा जणांपैकी दोघांनी गाडीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला मात्र चार जणांना गाडीतून बाहेरच पडता न आल्याने त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.