शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा 'आझाद मैदाना'त होणार!

मुंबई : दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण क्रॉस मैदानावर क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे.


दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी यंदा देखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रॉस मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला. मागील वर्षी शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं.

Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर