नाशिक (प्रतिनिधी) – सिन्नर सारख्या छोट्या पण विकसनशील शहरातील तरुणाई कुठल्या दिशेने आपले आयुष्य घेऊन जात आहे याचे भयानक वास्तव नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने उध्वस्त केलेल्या कॅफेतून उघड झाले आहे.
सिन्नरच्या सांगळे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या या कॅफेत तरुण तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची गुप्त माहिती हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी छापा टाकला असता या कॅफेत ना चहा, ना कॉफी, ना ग्लास दिसले… आढळले फक्त बादली भर निरोध.
या कारवाईमुळे कॅफेच्या आडून सुरु असलेल्या बदफैली धंद्याचे कुटील रूप सिन्नरच्या वेशीवर टांगले गेले आहे.आठवन कॅफे, रिलेक्स कॅफे,व्हाट्स अँप कॅफे, चौदा चौक वाडा सांगळे कॅाम्प्लेक्स सिन्नर
हर्ट बिट कॅफे सिन्नर बसस्टॅड समोर या ठिकाणी ही छापेमारी झाली.
या कारवाईचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी स्वागत तर केलेच शिवाय तमाम सिन्नरकर जनता देखील पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.नाशिक शहरात देखील अशी धाडसी कारवाई अपेक्षित आहे.