Accident: समृद्धी अपघात प्रकरण, चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात(accident) १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. या अपघाताप्रकरणी चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.


दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या दोनही आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचीही माहिती आरटीओच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास बुलढाणा येथून नाशिककडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला. या बसमधील भाविक हे सैलानी बाबांचे दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.


या मार्गावर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रक थांबवला होता. याचवेळेस ही मिनी ट्र्रॅव्हल बस मागून आली आणि तिची जोरदार धडक या ट्रकला बसली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले.


प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर अशी कारवाई करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावे आहेत तर ब्रिजेशकुमार कमलसिंग चंदेल असे या चालकाचे नाव आहे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



घटनेचा व्हिडीओ आला समोर


अपघात झालेल्या ट्रॅव्हल बसमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतत होते. समृद्धी महामार्गावर असताना आरटीओच्या अधिकार्‍यांनी एक ट्रक चौकशीसाठी रस्त्यात थांबवून ठेवला होता. मागून येणार्‍या बसचालकाला हा ट्रक थांबला आहे की सुरु आहे याचा अंदाज न आल्याने बस ट्रकला धडकली आणि अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.


व्हिडीओतून अपघात होण्याच्या काही वेळ आधीच हा ट्रक थांबवल्याचे दिसत आहे. शिवाय भर रस्त्यातच ट्रकची चौकशी सुरु आहे. आरटीओ अधिकार्‍यांनी ट्रक अडवला नसता किंवा चौकशीसाठी ट्रक महामार्गाच्या कडेला थांबवला असता तर संभाव्य अपघात टळला असता. त्यामुळे आरटीओच्या चुकीमुळे १२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "