Share Market : शेअर बाजारात नव्या खरेदीसाठी योग्य नियोजन हवे…

Share
  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात देखील मर्यादित तेजी झाली. सध्या निर्देशांकात अल्पमुदतीच्या चार्टनुसार मोठ्या मंदीनंतरची तेजी या चक्रात आहे. पुढील काळात निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अल्पमुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र फंडामेंटल बाबींकडे पाहता निर्देशांक महाग आहेत. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची १९३०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या वर आहेत तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील. फंडामेंटल बाबींचा विचार करता निर्देशांकांचे पीई गुणोत्तर हे खूप जास्त आहे.

टेक्निकल अॅनालीसीसनुसार सिंजिन, आयटीसी, करिअर पॉइंट, न्युक्लीयस सॉफ्टवेअर, ग्लेनमार्क फार्मा यासह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. अल्पमुदतीचा विचार करता ‘शालिमार पेंट्स’ या शेअरने १८४ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज १९२ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. शेअर खरेदी करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर अत्यंत आवश्यक आहे. मी माझ्या मागील अर्थात १७ जुलै २०२३ च्या लेखात अल्पमुदतीचा विचारकरिता ‘झोमॅटो’ या शेअरने ८० ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे ८२.५० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात केल्यास चांगला फायदा होऊ शकेल हे सांगितलेले होते. या आठवड्यात देखील या शेअरमधील तेजी कायम राहत या शेअरने ११३ हा उच्चांक नोंदविला. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार अल्प मुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची झालेली आहे. जोपर्यंत सोने ५७८०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी कायम राहील. अल्प मुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गती तेजीची आहे. टेक्निकल अॅनालिसीसनुसार जोपर्यंत चांदी ६९००० या पातळीच्यावर आहे तोपर्यंत चांदीमधील तेजी कायम राहील.

अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाही. परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे ही मोठी चूक ठरू शकते. याला कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात. त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना टेक्निकल आणि फंडामेंटल अशा दोन्ही बाबींचा आपल्याला विचार करणे आवश्यक असते. शेअर बाजारामध्ये निर्देशांकांची असणारी मुख्य दिशा आणि त्यानंतर त्या मुख्य दिशेच्या विपरीत असणारी दिशा अर्थात करेक्शन या दोन्ही गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करावी लागते. शेअर बाजाराची मुख्य दिशा तेजीची असेल तर येणारे करेक्शन ही खरेदीची संधी असते. याउलट शेअर बाजाराची मुख्य दिशा मंदीची असेल तर येणारे करेक्शन अर्थात बाउन्स ही शेअर्स विक्रीची संधी असते. सध्या शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे मात्र टेक्निकल आणि फंडामेंटल बाबतीत निर्देशांक हे उच्चांकाला असल्याने शेअर्स खरेदी करण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापुढे काही काळ कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस लावून केवळ अल्पमुदतीच्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

7 mins ago

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची…

8 mins ago

Raj Thackeray : १६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खटल्यात राज ठाकरे निर्दोष!

इस्लामपूर न्यायालयाचा मोठा निर्णय सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत एक मोठी…

31 mins ago

Dharmaveer 2 : ज्याच्या घरातील स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की!

मराठीसह हिंदीत 'धर्मवीर २'चा धगधगता टीझर आऊट मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक धर्मवीर आनंद…

1 hour ago

Assam Rain : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे ५२ लोकांनी गमावले प्राण

८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली दिसपूर : सध्या देशभरात…

3 hours ago

Raigad Accident : भीषण अपघात! दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे…

3 hours ago