Ravindra Waikar : ठाकरे गटाला झटका! रवींद्र वायकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

शिवसेनेसाठी मोठा दिलासा


मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे आधीच ५०० कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेलच्या घोटाळ्यात अडचणीत आहेत. भाजपचे आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्याविरोधात केलेल्या आरोपांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता रवींद्र वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai Highcourt) सादर केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. राज्य सरकार आमदार निधी वाटपात दुजाभाव करीत आसल्याचा आरोप करणारी ती याचिका होती. मात्र, यासंदर्भात कुठलेही ठोस पुरावे नसल्याचे सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.


सत्ताधारी आणि विरोधकांच्या आमदार निधी तफावत असल्याचा आरोप करणारी रिट याचिका रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या राजकीय पक्षांच्या आधारे भेदभाव न करता महाराष्ट्र स्थानिक विकास (MLD) निधीचं समान वाटप करण्यात यावं, मात्र तसं होत नाही आहे. यात भाजप आणि शिंदे गटाच्या काही आमदारांना झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.


मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून शिंदे सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या द्विसदस्य खंडपिठानं याप्रकरणी निर्णय दिला. याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा झटका आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.