भाईंदर : मीरा रोड येथे काशीमीरा पोलिस ठाण्यासमोरच असलेल्या इंटरनॅशनल बेकिंग कंपनी नावाच्या बेकरीत आज सकाळी गोळीबाराचा प्रयत्न झाला. एका तरुणाने दुकानदारावर बंदूक रोखल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक हेल्मेट घातलेला तरुण दुकानात शिरला आणि त्याने दुकानदारांवर बंदूक रोखली परंतु तो गोळीबार करू शकला नाही म्हणून त्याने काही न बोलताच दुकानातून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून त्या भागातील वातावरण तंग झाले आहे. पोलिस उपायुक्त जयंत बजबळे तसेच काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पोलिस त्या इसमाचा शोध घेत आहेत.
सदर दुकान अनेक गुन्हे दाखल असलेल्या या भागातील पटेल कुटुंबीयांचे आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असून गुटखा, जमिनीचा वाद, दहशत पसरवणे असे अनेक तर्कवितर्क लावून पाहिले जात आहेत. पोलीस सर्व बाबी तपासून पाहत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…