नवी दिल्ली : सियालदह एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारची आहे. गोळीबारानंतर या त्याव्यक्तीला रेल्वेतून उतरवून अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
गोळीबार करताना ही व्यक्ती नशेत तर नव्हती ना याचा शोध पोलीस घेत आहेत.यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेदरम्यान सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या वकीलाने सांगितले की अचानक घडलेल्या या घटनेने सारेच प्रवासी प्रचंड घाबरले. संपूर्ण ट्रेनची तपासणी केली जावी अशी त्यांची इच्छा होती.
अशाच पद्धतीचे प्रकरण जुलैमध्येही समोर आले होते. तेव्हा पालघर स्टेशनजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ३१ जुलैला रेल्वे सुरक्षा दलातील माजी कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना आणि रेल्वेतील तीन अन्य प्रवाशांची गोळी घालून हत्या केली होती.
या प्रकरणी चौधरीवर या गुन्ह्या वापरल्या गेलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात हत्या आणि अपहरणाची केसही दाखल करण्यात आली होती. याशिवाय चौधरीवर धर्माच्या आधारावर गटादरम्यान विरोध भडकावण्याचा आरोपही करण्यात आला होता.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…