Chitra Wagh : मोठ्ठ्या ताई, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे...

भाजपच्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका


मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) दोन गटांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र, पवार कुटुंबीय कधी एकमेकांच्या विरोधात बोलतात तर कधी एकमेकांची बाजू घेतात. अशातच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज एक वक्तव्य केलं. अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मीच घालेन, मात्र आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गृहमंत्री बनवू नये, असं ते वक्तव्य होतं. यावर आता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि धडाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तर दिले आहे.


चित्रा वाघ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळेंवर तिखट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, राज्याच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रियाताई. १०० कोटी रुपये वसुली करून देणारा गृहमंत्रीच तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही.


पुढे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत, महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण... ससून प्रकरणात ९ पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला तेही आवडले नसेल कारण... हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण... कारण मोठ्ठ्या ताई, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री... अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.





तुम्हाला नक्की काय हवंय?


तुम्हाला आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री? मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? असं सडेतोड उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता