मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) दोन गटांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र, पवार कुटुंबीय कधी एकमेकांच्या विरोधात बोलतात तर कधी एकमेकांची बाजू घेतात. अशातच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज एक वक्तव्य केलं. अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मीच घालेन, मात्र आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गृहमंत्री बनवू नये, असं ते वक्तव्य होतं. यावर आता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि धडाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळेंवर तिखट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, राज्याच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रियाताई. १०० कोटी रुपये वसुली करून देणारा गृहमंत्रीच तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही.
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत, महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण… ससून प्रकरणात ९ पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला तेही आवडले नसेल कारण… हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण… कारण मोठ्ठ्या ताई, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री… अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
तुम्हाला आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री? मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? असं सडेतोड उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…