Toll Scam : ..तर आम्ही टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

  133

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम


मुंबई : प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल (Toll) नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रविवारी म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.


राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.


यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहे. त्यामुळे प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले.


तसेच त्याच-त्याच लोकांना कंत्राट मिळते कसे? असे प्रश्न राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. तसेच यावेळी पत्रकार परिषदेतच राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे टोल संबंधीत जुने सात व्हिडिओ दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या जुन्या क्लीप त्यांनी दाखवल्या.


व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, ही माणसं प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात, या सगळ्यांची सरकारे महाराष्ट्रात येऊ गेली पण एकही गोष्ट झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांचं उदरनिर्वाहाचं साधण आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे

पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं? मुंबईच्या दहीहंडी उत्सवातून फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई: राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाला राजकीय रंगाचीही

बीएमसीच्या ‘पार्किंग’साठी ‘वृक्षतोड’

मुंबई : आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनजवळ आठ झाडे तोडण्याच्या आणि चार इतर झाडांचे स्थलांतर करण्याच्या 'बृहन्मुंबई

गर्भवती बांगलादेशी महिला जेजे रुग्णालयातून फरार, पोलिसांचा शोध सुरू

मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती.

घाटकोपर येथील दहीहंडीद्वारे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी सैनिकांच्या शौर्याला सलाम- देवेंद्र फडणवीस

मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर

‘दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम

मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’